Bihar Viral Video | अरे आता हे काय? प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबताच प्रवाशाने काय उतरून काय केलं बघा; पाहून पोलिसांनी दिला चोप; VIDEO व्हायरल

Bihar Viral Video : भारतीय रेल्वेचा प्रवास म्हणजे अनुभवांची खाणच म्हणावी लागेल. कधी डब्यातील गोंधळ, कधी अनोळखी माणसांची ओळख, तर कधी असे प्रसंग जे पाहून आश्चर्य वाटत. रेल्वेस्थानकांवर रोज लाखो लोकांची ये-जा असते आणि त्यातच कधी कधी असे काही घडते की, ते थेट सोशल मीडियावर व्हायरल होत.

 

सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे, ज्यात एका प्रवाशाने चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रेन थांबलेली असतानाच उघड्यावर अंघोळ केल्याचे दिसत आहे. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला असून “हे फक्त भारतातच होऊ शकतं” अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिली जात आहे.हा व्हायरल व्हिडीओ रेल्वेस्थानकावरील एका विचित्र आणि धक्कादायक घटनेवर आधारित आहे.

 

ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेली असताना, काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकजवळ असलेल्या पाण्याच्या पाइपचा वापर करून थेट तिथेच अंघोळ सुरू केल्याचं या व्हिडीओत दिसतं. हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडत असल्यामुळे अनेक प्रवासी आश्चर्यचकित झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

 

व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, एक युवक ट्रेनमधून उतरून थेट प्लॅटफॉर्मजवळील ट्रॅकवर उभा आहे. तिथे आधीच असलेल्या पाण्याच्या पाइपमधून पाणी येत असतं आणि तो युवक अगदी आरामात अंघोळ करायला सुरुवात करतो. विशेष म्हणजे त्याच्यामागे आणखी एक युवकदेखील तिथे अंघोळ करताना दिसतो. दोघांनाही आजूबाजूचं काहीच देणं-घेणं नसल्यासारखं त्यांच्याकडे पाहून वाटतं.

 

पाहा व्हिडीओ

 

Leave a Comment