भर रस्त्यात ओलांडली मर्यादा! तरुणाने बाईकवर बसलेल्या तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य, VIDEO होतोय व्हायरल. Girl Video Viral

Girl Video Viral: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय.सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत.

अनेकदा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नवरा बायको, प्रेयसी प्रियरकरामध्ये झालेले वाद आपण पाहत असतो. पण या वादात पडणार कोण म्हणून कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. पण अनेकदा असे वाद टोकाला पोहोचतात आणि यात मारहाणही होते.

सोशल मीडियावर अनेकदा अशा सगळ्या विकृत घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यात एका तरुणाने भररस्त्यात तरुणीबरोबर असं काही केलं की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

बापाचं प्रेम! लंडनला जाणाऱ्या लेकीबरोबर ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला; अनेक धक्कादायक व्हिडिओ आले समोर Ahmedabad plane crash Viral Video

तरुणाची तरुणीला मारहाण (Man abuses Woman Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एका बाईकवर एक तरुण आणि तरुणी बसलेले दिसतायत. व्हिडीओत, त्यांच्यामध्ये वाद होताना दिसतोय. या वादात तरुण बाईकवर मागे बसलेल्या तरुणीला कानाखाली मारतो. तसंच तो तिला बाईकवरून जमिनीवर पाडतो. खाली पडल्यावरदेखील तो तिला मारहाण करणं सुरूच ठेवतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @abc_remix_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “नागपूरमध्ये दिवसा एका मुलीबरोबर गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्हयुज आले आहेत. दरम्यान, ही घटना नागपुरात घडली असल्याचं म्हटलं जातंय.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जेव्हा मुलगी सहन करते तेव्हाही तिला बोललं जातं, जेव्हा ती बोलते तेव्हाही तिला बोललं जातं, लोक का मुलीला समजून घेत नाही कळत नाही” तर दुसऱ्याने “ती सहन का करत आहे याचा मार” अशी कमेंट केली. तर एकाने “प्रेमात वेडी असेल म्हणूनच त्याचा मार खाऊन घेतेय” अशी कमेंट केली.

पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा मोठा इशारा! Punjabrao Dakh Hawaman Andaaj

Leave a Comment